Ad will apear here
Next
निवडणुकीच्या हेल्पलाइनची ३० मदत केंद्रे कार्यरत
मुंबई : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने १९५० ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत ३० मदत केंद्रे कार्यरत करण्यात आली असल्याने मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होत आहे.

१९५० या हेल्पलाइनवर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. २४ तास कार्यरत असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMSBY
Similar Posts
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सदिच्छादूतांचे आवाहन मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्त्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध १२ मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे.
मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ‘कोरडा दिवस’ मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून, तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे,’ असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ४४ हजार ईव्हीएम, २० हजार व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. आठवडाभरावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर एक कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत
मुंबईत ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षा’ पुस्तिकेचे प्रकाशन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव अश्वनी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र सायबर कार्यालयाने तयार केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language